विज्ञानाचा अविष्कार आणि निसर्गाचा उपहार

आपल्याला निसर्गाचा नियम माहीत आहेच, विरूध्द प्रभार परस्परांकडे आकर्षिले जातात आणि सारखे प्रभार एकमेकांपासुन त्यांच्यातील उर्जेच्या प्रमाणात परस्परांपासुन दूर ढकलले जातात. ह्या अगदी साध्या तत्वावर इलेक्ट्रोस्टॅटीक ब्लोअर काम करतात. तथास्तु सर्विसेस ह्यांनी तज्ञ शेतक-यांबरोबर दोन वर्ष सतत अभ्यास करुन परदेशांतुन आयात केलेल्या अनेक उपरणांबरोबर तुलना करुन अगदी उत्कृष्ठ स्वरुपाचे परिणामकारक इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेईंग ब्लोअर तयार केला आहे. अधिक वाचा...

इलेक्ट्रोस्टॅटीक आणि परिणाम करणारे घटक

स्प्रेईंगसाठी जे इलेक्ट्रोस्टॅटीक तथास्तु सर्विसेस यांनी बनविले आहे ते नोझलमधुन निघणा-या 5-7 मायक्रॅनपासुन ते 150 मायक्रोनपर्यंतच्या थेंबाना चार्ज करण्यासाठी बनविले आहे. हे बनवताना ब-याच परिणामकारक घटकांचा अभ्यास केला आहे. वापरले जाणारे नोझल, चार्ज करण्यासाठी लागणारे व्होलटेज, नोझलचा स्प्रे कोन, थेंबाचे आकारमान, फॅनमधून तीव्रगतिने बाहेर पडणारी हवा, त्याचबरोबर वातावरणाचे तापमान, वा-याचा वेग, स्प्रे घेण्याची वेळ, आद्रता ह्यांचा सर्वांचा आपण घेतलेल्या स्प्रेअरवर परिणाम होतो. अधिक वाचा...

तथास्तु इलेक्ट्रोस्टॅटीक

तथास्तुचे इलेक्ट्रोस्टॅटीक मशिनचा वापर करुन तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेअरचे फायदे मिळवू शकतात. आपल्याजवळ असलेल्या ब्लोअर बद्दलची संपुर्ण माहीती आपल्याला असते. तसेच त्याबरोबर एकरी क्षेत्रासाठी पाण्याचा वापर, PTO शाफ्ट, स्प्रेअर नोझल, पाण्याला वापरलेले प्रेशर, ट्रॅक्टरचा स्पीड, आपण ह्याच माहीतीच्या आधारावर आजपर्यंत चांगल्यात चांगले स्प्रे घेतलेले असतात. आता ह्याच अनुभवामध्ये तथास्तु इलेक्ट्रोस्टॅटीकचा वापर करुन अजून उत्कृष्ट प्रकारचे उत्पादन मिळवु शकतात. अशा प्रकारे कमी किमतीत इलेक्ट्रोस्टॅटीकचा फायदा मिळवता येतो. अधिक वाचा...

इलेक्ट्रोस्टॅटीकमुळे होणारे फायदे

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेमुळे स्प्रेईंगचे थेंब सारख्या प्रमाणात पसरुन द्राक्षवेलींवर एकसारखी फवारणी होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीकने चार्ज झालेले थेंब झाडावर जातांना किंवा पडल्यानंतरही ते एकमेकात एकत्रित होत नाही तसेच पांनांवर किंवा द्राक्षांच्या घडांवर ओघळही तयार करत नाही. त्यामुळे जास्तित जास्त कव्हरेज (क्षेत्र) प्राप्त होते.
अधिक वाचा...