विज्ञानाचा अविष्कार आणि निसर्गाचा उपहार –

आपल्याला निसर्गाचा नियम माहीत आहेच, विरूध्द प्रभार परस्परांकडे आकर्षिले जातात आणि सारखे प्रभार एकमेकांपासुन त्यांच्यातील उर्जेच्या प्रमाणात परस्परांपासुन दूर ढकलले जातात. ह्या अगदी साध्या तत्वावर इलेक्ट्रोस्टॅटीक ब्लोअर काम करतात. तथास्तु सर्विसेस ह्यांनी तज्ञ शेतक-यांबरोबर दोन वर्ष सतत अभ्यास करुन परदेशांतुन आयात केलेल्या अनेक उपरणांबरोबर तुलना करुन अगदी उत्कृष्ठ स्वरुपाचे परिणामकारक इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेईंग ब्लोअर तयार केला आहे. आपल्या नेहमीच्या वापराच्या ब्लोअरवर तथास्तु इलेक्ट्रोस्टॅटीक बसविता येतो. त्यासाठी तुम्हाला खुप खर्च करण्याची आवश्यकता नाही. फक्त तथास्तुचे इलेक्ट्रोस्टॅटीक मशिनचा वापर करुन तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेअरचे फायदे मिळवू शकतात. आपल्याजवळ असलेल्या ब्लोअर बद्दलची संपुर्ण माहीती आपल्याला असते. तसेच त्याबरोबर एकरी क्षेत्रासाठी पाण्याचा वापर, PTO शाफ्ट, स्प्रेअर नोझल, पाण्याला वापरलेले प्रेशर, ट्रॅक्टरचा स्पीड, आपण ह्याच माहीतीच्या आधारावर आजपर्यंत चांगल्यात चांगले स्प्रे घेतलेले असतात. आता ह्याच अनुभवामध्ये तथास्तु इलेक्ट्रोस्टॅटीकचा वापर करुन अजून उत्कृष्ट प्रकारचे उत्पादन मिळवु शकतात. अशा प्रकारे कमी किमतीत इलेक्ट्रोस्टॅटीकचा फायदा मिळवता येतो.

इंडक्शन प्रकारातील इलेक्ट्रोस्टॅटीकच का –

इलेक्ट्रोस्टॅटीक चार्जिंग प्रकारामध्ये दोन प्रकारच्या पध्दती असतात, एक इंडक्शन चार्जिंग व दुसरे कंडक्शन चार्जिंग. संपुर्ण जगामध्ये दोन्ही प्रकारांचा अभ्यास करुन इंडक्शन चार्जिंगपासुन जास्त फायदे झाल्याचे सर्वेक्षणात लक्षात आले आहे. त्याच्यातला इंडक्शन चार्जिंगचे फायदे खालील प्रमाणे आहेत –

  • इलेक्ट्रोस्टॅटीक साठी लागणारे विद्दुतप्रवाह हा पाण्याबरोबर सरळ संपर्कात येत नाही. त्यामुळे त्यामधिल इलेक्ट्रोस्टॅटीक विद्दुत क्षेत्राची ताकद ही हवेतील पाण्याचे थेंबाच्या क्षेत्रावर अवलंबुन असते. त्यामुळे थेंबाच्या आकारमानाप्रमाणे विद्दुतप्रवाहात सहज बदल करुन आपण जास्तित जास्त थेंबाना चार्ज करु शकतो.
  • (High Voltage) उच्च दाबाच्या विद्दुतप्रवाहामुळे उच्च दाबाचे चार्जिंग क्षेत्र तयार करणारी यंत्रणा आपण सुरक्षितपणे आर्थिंग पासुन लांब ठेवू शकतो, ज्यामुळे स्टॅटीक व्होलटेजचे क्षेत्र समप्रमाणात राहते.
  • चार्ज करणारे इलेक्ट्रोड पाण्याच्या सरळ संपर्कात येत नाही त्यामुळे तयार होणारे व्होलटेज (उच्च दाबाचा विद्दुतप्रवाह) कमी होण्याची कमी होते.

या कारणांमुळे इंडक्शन प्रकारातील इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेअरलाच जास्त मान्यता देण्यात आली आहे.

इलेक्ट्रोस्टॅटीकमुळे होणारे फायदे

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेमुळे स्प्रेईंगचे थेंब सारख्या प्रमाणात पसरुन द्राक्षवेलींवर एकसारखी फवारणी होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीकने चार्ज झालेले थेंब झाडावर जातांना किंवा पडल्यानंतरही ते एकमेकात एकत्रित होत नाही तसेच पांनांवर किंवा द्राक्षांच्या घडांवर ओघळही तयार करत नाही. त्यामुळे जास्तित जास्त कव्हरेज (क्षेत्र) प्राप्त होते.
अधिक वाचा...