इलेक्ट्रोस्टॅटीकमुळे होणारे फायदे

स्प्रेचे कव्हरेज वाढते

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेमुळे स्प्रेईंगचे थेंब सारख्या प्रमाणात पसरुन द्राक्षवेलींवर एकसारखी फवारणी होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीकने चार्ज झालेले थेंब झाडावर जातांना किंवा पडल्यानंतरही ते एकमेकात एकत्रित होत नाही तसेच पांनांवर किंवा द्राक्षांच्या घडांवर ओघळही तयार करत नाही. त्यामुळे जास्तित जास्त कव्हरेज (क्षेत्र) प्राप्त होते. थेंबांचा आकारही सारखा ठेवला जातो. संपुर्ण झाड अगदी झाडाच्या कॅनोपीपर्यंत स्प्रेईंगचे कव्हरेज मिळते.

खते, रसायने आणि किटकनाशक यांचा चांगला परिणाम

ज्याप्रमाणे नोझलमधुन निघालेले पाण्याचे थेंब सारख्या प्रमाणात झाडाच्या कानाकोप-यात जावून पोहचतात त्याचप्रमाणे पाण्यातुन दिलेली खते किंवा रसायने समप्रमाणात पोहचतात व ते समप्रमाणात पोहच्यामुळे खतांचा प्रभाव सगळीकडे सारखा अनुभवायला मिळतो.

सारख्या आकाराची आणि चांगल्या गुणवत्तेची फळे

नेहमी वापरातील ब्लोअर विषम प्रमाणात स्प्रे करतात त्यामुळे फळे, फुले किंवा पानाकडील स्प्रे जास्त होतो व त्याच भागाकडील पोषण चांगले होते. त्यामुळे फळांची वाढही विषम प्रमाणात होते. पण, तथास्तु इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेईंग ब्लोअरमुळे फळे सारख्या प्रमाणात वाढतात आणि गुणवत्ताही चांगली मिळते.

पैशांची बचत

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेईंग ब्लोअरमुळे खतांची बचत होते कारण नोझलमधुन निघणारा स्प्रेचा फवारा हा जमिनीवर पडण्याआधी तीव्र विरुध्द प्रभाराच्या आकर्षणामुळे झाडाकडे ओढला जातो. त्यामुळे जमिनीवर जाणा-या खताची बचत होते व 95 टक्के खतांचा वापर झाडासाठी होतो. पर्यायाने पैशांची बचत होते व उत्पादनात भरघोस वाढ होते.

इलेक्ट्रोस्टॅटीकमुळे होणारे फायदे

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेमुळे स्प्रेईंगचे थेंब सारख्या प्रमाणात पसरुन द्राक्षवेलींवर एकसारखी फवारणी होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीकने चार्ज झालेले थेंब झाडावर जातांना किंवा पडल्यानंतरही ते एकमेकात एकत्रित होत नाही तसेच पांनांवर किंवा द्राक्षांच्या घडांवर ओघळही तयार करत नाही. त्यामुळे जास्तित जास्त कव्हरेज (क्षेत्र) प्राप्त होते.
अधिक वाचा...