पैशांची बचत

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेईंग ब्लोअरमुळे खतांची बचत होते कारण नोझलमधुन निघणारा स्प्रेचा फवारा हा जमिनीवर पडण्याआधी तीव्र विरुध्द प्रभाराच्या आकर्षणामुळे झाडाकडे ओढला जातो. त्यामुळे जमिनीवर जाणा-या खताची बचत होते व 95 टक्के खतांचा वापर झाडासाठी होतो. पर्यायाने पैशांची बचत होते व उत्पादनात भरघोस वाढ होते.

इलेक्ट्रोस्टॅटीकमुळे होणारे फायदे

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेमुळे स्प्रेईंगचे थेंब सारख्या प्रमाणात पसरुन द्राक्षवेलींवर एकसारखी फवारणी होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीकने चार्ज झालेले थेंब झाडावर जातांना किंवा पडल्यानंतरही ते एकमेकात एकत्रित होत नाही तसेच पांनांवर किंवा द्राक्षांच्या घडांवर ओघळही तयार करत नाही. त्यामुळे जास्तित जास्त कव्हरेज (क्षेत्र) प्राप्त होते.
अधिक वाचा...