तथास्तु इलेक्ट्रोस्टॅटीकची काम करण्याची पध्दत व वैशिष्टे –

तथास्तु इलेक्ट्रोस्टॅटीक ब्लोअरमध्ये इलेक्ट्रिक युनीटमधून उच्च दाबाचा विद्दुतप्रवाह तयार केला जातो. तो एका 50केव्ही विद्दुतरोधक वायरमधुन इलेक्ट्रोडपर्यंत पोहचवला जातो. इलेक्ट्रोडची रचना नोझलपासुन साधारण दीड ते दोन इंच अंतरावर गोलाकार पध्दतीत केलेली आहे. कंट्रोल युनिटला दिलेल्या चावीने युनिट चालु केले जाते. कंट्रोल युनिटवर एक सारखे चमकणारे लाईट बॅटरीचा पोहोचलेला विद्दुत प्रवाह दर्शविते, तर चालु-बंद होणारा लाईट इलेक्ट्रोस्टॅटीक चालु झाल्याचे दर्शविते.

इलेक्ट्रोडचा जो भाग विद्दुतरोधकापासुन खुला केलेला आहे, त्या भागापासुन इलेक्ट्रोस्टॅटीक क्षेत्राची सुरवात होते. त्या भागापासुन इलेक्ट्रोस्टॅटीक क्षेत्राची सुरवात होते. ह्या विद्दुत क्षेत्राचे आकारणान साधारण 6 ते 7 इंचापर्यंत तयार होते. नोझलमधुन निघणारा पाण्याचा थेंब ह्या इलेक्ट्रोस्टॅटीक क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. कमीत कमी मायक्रोन आकारमानाच्या थेंबापासुन जास्तित जास्त 150 मायक्रोनच्या थेंबापर्यंतचे सर्व पाण्याचे थेंब ह्या इलेक्ट्रोस्टॅटीक क्षेत्रामध्ये चार्ज होतात. ह्या सर्व थेंबांचे सारख्या विद्दुत प्रभार म्हणजेच धन प्रभार तयार होतो व सर्व थेंब एकमेकांपासुन दुर लोटण्याचा प्रयत्न करतात. त्याच बरोबर त्याच्यामध्ये ऋण प्रभाराबद्दल तीव्र आकर्षण निर्माण झालेले असते. सारख्या प्रभारामुळे ते एकमेकांना चिकटत किंवा आकर्षिले जात नाही. नंतर त्यांचे धुक्यासारख्या बारीक थेंबात रुपांतर होऊन ते तीव्र गतिने विरुध्द ऋण प्रभाराकडे आकर्षिले जातात. त्यांच्यामधिल ऋणप्रभारा बद्दलचे आकर्षण हे गुरुत्वाकर्षणाच्या 40 पटीने अधिक असते. त्यामुळे ते जमिनीकडे न आकर्षिता झाडाकडे आकर्षिले जातात. एकमेकांपासुन प्रतिकार्षणाच्या गुणधर्मामुळे झाडावर पडतांनाही हे एकमेकांपासुन प्रतिकार्षणाच्या ताकदीप्रमाणे विभागले जातात. एकमेकांपासुन प्रतिकार्षणाच्या गुणधर्मामुळे झाडावर पडतांनाही हे एकमेकांपासुन प्रतिकार्षणाच्या ताकदीप्रमाणे विभागले जातात. अगदी झाडांच्या दाट फांद्दांपर्यंत पोहचतात. तसेच पानांच्या पाठीमागच्या बाजूने देखिल जावून चिकटतात, तसेच फळांच्या सर्व बाजुने स्प्रेचा सारखा शिडकाव होतो. अगदी गर्दीच्या पानांपर्यंत नोझलमधुन निघालेला स्प्रे इलेक्ट्रोस्टॅटीकच्या मदतीने अगदी संपूर्ण झाडाला पोहचवला जातो. प्रतिकार्षणाच्या गुणधर्मामुळे स्प्रेईंगचे झाडावर ओघळ तयार होत नाही. तसेच एकमेकांवर थेंबाचे थरही साचत नाही. सर्व थेंब एकमेकांपासुन सारखे समप्रमाणात पसरले जातात.

इलेक्ट्रोस्टॅटीकमुळे होणारे फायदे

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेमुळे स्प्रेईंगचे थेंब सारख्या प्रमाणात पसरुन द्राक्षवेलींवर एकसारखी फवारणी होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीकने चार्ज झालेले थेंब झाडावर जातांना किंवा पडल्यानंतरही ते एकमेकात एकत्रित होत नाही तसेच पांनांवर किंवा द्राक्षांच्या घडांवर ओघळही तयार करत नाही. त्यामुळे जास्तित जास्त कव्हरेज (क्षेत्र) प्राप्त होते.
अधिक वाचा...